Sarfaraz Khan broke Rohit Sharma record : भारतीय क्रिकेटमधील देशांतर्गत स्पर्धेत (विजय हजारे ट्रॉफी) मुंबईच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. सर्फराझ खान आणि त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान या जोडीने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत मुंबईला ४४४ धावांचा डोंगर उभा करून दिला. या खेळीदरम्यान सर्फराझने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक खास विक्रमही आपल्या नावे केला आहे. रोहित शर्माचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा या सामन्यात सर्फराझ खानने अवघ्या ५६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान लिस्ट-A शतक ठरले आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने सिक्कीमविरुद्ध ६२ चेंडूंत शतक झळकावले होते. सर्फराझने अवघ्या काही दिवसांतच रोहितचा हा विक्रम मोडीत काढत आपली दावेदारी सिद्ध केली आहे. रोहितने त्या सामन्यात १५५ धावा केल्या होत्या, तर सर्फराझने गोव्याविरुद्ध केवळ ७५ चेंडूंमध्ये १५७ धावांची स्फोटक खेळी खेळली. दोन्ही भावांची ‘तूफानी’ फटकेबाजी मुंबईच्या या विशाल धावसंख्येत खान बंधूंचे मोठे योगदान राहिले: सर्फराझ खान: १५७ धावा (७५ चेंडू), १४ षटकार आणि ९ चौकार. (स्ट्राइक रेट: २१०) मुशीर खान: ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी. एकूण प्रभाव: दोघांनी मिळून १६ षटकार आणि १४ चौकार ठोकले. हेही वाचा –Mohsin Raza Naqvi : आशिया ट्रॉफी हवी असेल तर सूर्यकुमारला पाठवा; पाकच्या मोहसीन नक्वींचा निर्लज्जपणा पुन्हा जगासमोर खेळाडू धावा चेंडू षटकार/चौकार सरफराज खान १५७ ७५ १४/९ मुशीर खान ६० – – मुंबई एकूण ४४४/८ ५० षटके – या दोघांशिवाय हार्दिक तमोरेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ४४४ धावा केल्या. मुंबईच्या क्रिकेट इतिहासातील हे दुसरे सर्वात मोठे लिस्ट-A धावसंख्या (Score) आहे. प्रत्युत्तरात गोव्याचा संघ ३५७ धावाच करु शकला. ज्यामुळे मुंबईन ८७ धावांनी विजय मिळवला. हेही वाचा – Aman Khan : CSK चे 40 लाख पाण्यात! ज्याच्यावर विश्वास दाखवला ‘त्या’ खेळाडूच्या नावावर नकोश्या विक्रमाची नोंद फिटनेस आणि फॉर्मचा ‘धमाका’ – काही काळापूर्वी सरफराज खान केवळ रेड-बॉल (कसोटी) क्रिकेटचा खेळाडू मानला जात होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ६३.१५ इतकी जबरदस्त आहे. मात्र, फिटनेसमध्ये केलेल्या सुधारणेनंतर त्याने व्हाईट-बॉल क्रिकेटमध्येही पुनरागमन केले आहे.