Bondi Beach Shooting : धक्कादायक! बॉन्डी बीच गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला, ११ हून अधिक ठार

Bondi Beach Shooting Michael Vaughan escaped : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहर जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. मात्र, रविवारी बॉन्डी बीच परिसरामध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या थराराने संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला आहे. या दहशतवादी हल्ल्यात ११ हून अधिक निष्पाप नागरिक मारले गेले आहेत. विशेष म्हणजे, या हल्ल्यावेळी इंग्लंडचे माजी क्रिकेट कर्णधार मायकल वॉन हे देखील याच परिसरात उपस्थित होते.
रेस्टॉरंटमध्ये लपून मायकल वॉन यांनी वाचवला जीव –
मायकल वॉन यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आणि आपण सुरक्षित असल्याची पुष्टी केली. गोळीबाराच्या वेळी एका रेस्टॉरंटमध्ये लपून त्यांनी आपला जीव वाचवला. वॉन यांनी एक्सवर म्हटले की, “बॉन्डी येथील एका रेस्टॉरंटमध्ये लपून बसण्याचा अनुभव अतिशय भयावह होता. आता मी पूर्णपणे सुरक्षित आहे. आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्यांचे आणि ज्या व्यक्तीने त्या हल्लेखोराचा सामना केला, त्याचे खूप खूप आभार.”
Being locked in a restaurant in Bondi was scary .. Now home safe .. but thanks so much to the emergency services and the guy who confronted the terrorist .. thoughts with all who have been affected .. xxx
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 14, 2025
मायकल वॉन हे इंग्लंडचे यशस्वी माजी कर्णधार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली २००५ मध्ये इंग्लंडने ऐतिहासिक ॲशेस मालिका २-१ ने जिंकली होती, तसेच त्यांच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडचा कसोटी संघ जगात प्रथम क्रमांकावर पोहोचला होता. या गोळीबाराच्या घटनेनंतर सिडनी परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील अनेक दिग्गज खेळाडूंनी या भयंकर हल्ल्याचा निषेध केला आहे.
The man who risked his life to snatch a gun from an attacker in Australia is an Arab Muslim and is currently being treated in hospital in critical condition. The hero who disarmed the terrorist is Muslim. His name is Ahmed El Ahmad.#bondibeach pic.twitter.com/q6Q913TkAS
— Wajiha Tamseel Mirza (@WajihaTamseel) December 14, 2025





