Pune Crime | किरकोळ कारणावरुन तरुणावर तलवारीने वार; चौघांवर गुन्हा
Updated On:

पुणे – किरकोळ कारणावरुन तरुणाच्या डोक्यात तलवार व कोयत्याने वार करुन मारहाण करण्यात आली. ही घटना लोहियानगर येथील दत्त मंदिराजवळ घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी अज्यु शेख , सुलतान सय्यद, बच्ची शेख, इम्रान शेख यांच्याविरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी आफताब सय्यद (22,रा.लोहियानगर) याची आरोपींबरोबर दिड वर्षापुर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन अज्यु शेखने तलवारीने व बच्चु शेखने कोयत्याने आफताबच्या डोक्यात वार केले. तसेच इतरांनी लाकडी बांबूने मारहाण केली.
यानंतर परिसरात दहशत निर्माण करुन आफताबला तुला बघुन घेतो अशी धमकी देत पळ काढला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोसावी करत आहेत.
टॅग्स:





