Qatar Open | फेडररचे यशस्वी पुनरागमन
Updated On:

दोहा – स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर याने जवळपास एक वर्षांनी व्यावसायिक टेनिस स्पर्धेत थाटात पुनरागमन केले. त्याने येथे सुरू असलेल्या कतार ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पहिल्या फेरीच्या सामन्यात डॅनियल इव्हान्सचा 7-6, 3-6 व 7-5 असा पराभव केला. हा सामना तब्बल अडीच तास चालला व त्यात फेडररने आपली तंदुरुस्ती सिद्ध करताना आपल्या अनुभवाच्या जोरावर कोणतेही दडपण न घेता अखेरचा निर्णायक सेट टायब्रेकमध्ये जिंकला.
वयाच्या 39 व्या वर्षी फेडररने थाटात केलेले पुनरागमन त्याच्या चाहत्यांनाही सुखावून गेले. करोनाचा धोका वाढल्यानंतर त्याने अमेरिकन तसेच ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतून माघार घेतली होती. तसेच त्याला स्नायूंच्या दुखापतीनेही त्रस्त केले होते. मात्र, त्याने मेहनत घेत व तंदुरुस्ती सिद्ध करत पुनरागमन केले.





