जलतरणपटू एम. बी. बालकृष्णनचा अपघाती मृत्यू
Updated On:

चेन्नई – दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा जलतरणपटू एम. बी. बालकृष्णन याचे बुधवारी अपघातात निधन झाले.
29 वर्षीय बालकृष्णन बाईकवरून घरी जात असताना त्याचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने तो एका ट्रकखाली आला असता त्याचा जागीच मृत्यु झाला. त्याने आपले शिक्षण अमेरिकेत घेतले आणि तिथेच तो नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी तो चेन्नईत आला होता.





