जांबुत : (प्रफुल्ल बोंबे ) : जिल्हा परिषद पुणे अंतर्गत शिक्षण विभाग व पुणे जिल्हा मुख्याध्यापक तथा विज्ञान संघ आणि जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुल वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन वाघोली (पुणे) येथे नुकतेच संपन्न झाले.या तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेली पिंपरखेड (ता. शिरूर ) येथील श्रीदत्त विद्यालयातील इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी स्वराली नवनाथ दाभाडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून विद्यालयाचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल स्वरालीचे परिसरातून कौतुक होत असुन तिची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. स्वराली दाभाडे हिने उद्योन्मुख तंत्रज्ञान या विषयांतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान वापर यावर आधारित उपकरण बनविले असुन ते तिने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केले होते.यावेळी तिला पुढील सहभासाठी शुभेच्छा देत डी. आर. डी. ओ. चे संशोधक डॉ. नागरकर, जिल्हा मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष नंदकुमार सागर सर यांचेसह मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वैज्ञानिक उपकरण निर्मितीसाठी स्वराली दाभाडे हिला प्राध्यापक प्रियांका भोसले, रमेश गावशेते, प्रियांका येवले, नितीन कोकाटे, नारायण पाबळे, निसार शेख, सुप्रिया वरे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी तिचे ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खुशाल बोंबे,सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच विकास वरे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, आबाजी पोखरकर, प्राचार्य रामदास मगर यांनी अभिनंदन केले.