Swara Bhasker: स्वरा भास्करच्या सासऱ्यांना ब्रेन हॅमरेज; अभिनेत्रीची चाहत्यांना भावूक विनंती

Swara Bhasker : अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचे पती फहाद अहमद सध्या कठीण प्रसंगातून जात आहेत. स्वरा यांच्या सासऱ्यांना अचानक ब्रेन हॅमरेज झाला असून त्यांची तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीत स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांकडे प्रार्थना करण्याची भावूक विनंती केली आहे.
अचानक ब्रेन हॅमरेज, रविवारी शस्त्रक्रिया
स्वराने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती देत लिहिले की, “रात्री उशिरा फहाद यांचे वडील आणि माझे सासरे यांना ब्रेन हॅमरेज झाला. रविवारी सकाळी त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे.” पोस्टच्या शेवटी स्वराने सासऱ्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. स्वराने सांगितले की, सध्या तिचे पूर्ण लक्ष कुटुंबाकडे आहे आणि त्यामुळे ती काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहणार आहे.
View this post on Instagram
प्रेग्नन्सीनंतरचे पहिले काम
अलीकडेच स्वरा ‘पति पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमधील अनुभवांबद्दल बोलली. प्रसूतीनंतर कॅमेऱ्यासमोर केलेले हे तिचे पहिले काम होते.
स्वराने सांगितले की हा शो त्यांनी निवडला कारण त्याचा शेड्यूल सोपा होता आणि पुन्हा कामाला सुरुवात करण्याचा हा सहज मार्ग होता. सुरुवातीला शो कंफ्यूजिंग वाटला, पण नंतर त्यातून त्यांना खूप शिकायला मिळाले आणि तो अनुभव आनंददायी ठरला.
शोमध्ये सहभाग, पण विजेतेपदापासून दूर
स्वरा आणि फहाद यांनी या शोमध्ये भाग घेऊन प्रेक्षकांसमोर आपली सहज आणि मैत्रीपूर्ण छबी मांडली होती. दोघांनाही चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळाले. मात्र ते विजेते ठरू शकले नाहीत. शोच्या पहिल्या सीझनचे विजेते सेलिब्रिटी कपल रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला होते.





