hardik pandya natasa stankovic divorce udpate – टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने तिच्या इन्स्टाग्रामवरून पांड्याचे आडनाव काढून टाकले आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची अटकळ बांधली जात आहे. सोशल मीडियावरील अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की दोघांचा घटस्फोट झाला आहे आणि नताशाने हार्दिकची 70 टक्के संपत्ती तिच्या नावावर केली आहे.
यावेळी नताशा संपूर्ण आयपीएलमधून गायब होती. मुंबईतील कोणत्याही सामन्यासाठी नताशा चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली नव्हती. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंनी अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
नताशाने इंस्टावरुन पांड्या आडनाव काढून टाकले –
नताशाने शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. तीने एक फोटो देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये नताशा सेल्फी काढताना दिसत आहे.
नताशा आणि हार्दिक यांनी 31 मे 2020 रोजी लग्नगाठ बांधली –
अभिनेत्री नताशा आणि हार्दिक यांनी 31 मे 2020 रोजी लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा आहे. अगस्त्य असे त्याचे नाव आहे. मुलाच्या जन्माची माहिती खुद्द हार्दिकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. दोघांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर पारंपरिक रितीरिवाजांनी लग्न केले. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला.
मुंबईतील एका क्लबमध्ये हार्दिक आणि नताशा यांची भेट –
मुंबईतील एका क्लबमध्ये हार्दिक आणि नताशा यांची भेट झाली. तेथून दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हार्दिक जेव्हा त्याच्या करिअरच्या वाईट टप्प्यातून जात होता तेव्हा नताशाने त्याला खूप साथ दिली. जानेवारी 2020 मध्ये, दोघांनी दुबईमध्ये एकमेकांना अंगठी घातली आणि अधिकृतपणे एंगेजमेंट केली.
डीजे वाला बाबूमुळे नताशा प्रसिद्ध झाली –
नताशा स्टॅनकोविकचा जन्म 4 मार्च 1992 रोजी सर्बियामध्ये झाला. बॉलीवूडमधील तीचा पहिला चित्रपट सत्याग्रह होता. याशिवाय ती बिग बॉस 8 आणि नच बलिए 9 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. बादशाहच्या डीजे वाले बाबू या गाण्याने तीला खूप प्रसिद्धी मिळाली.
हार्दिकचे बडोद्यात 6 हजार स्क्वेअर फुटांचे पेंटहाऊस –
हार्दिक पांड्याकडे दोन घरे आहेत. बडोद्यात त्यांचे स्वतःचे आलिशान पेंटहाऊस आहे. बडोदा पेंटहाऊस 6,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. यात जिम आणि खाजगी थिएटर सारख्या अनेक आधुनिक सुविधा आहेत. येथे पांड्या त्याच्या कुटुंबासह राहतो. त्याच्या संग्रहात 4 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी ते 6.15 कोटी रुपयांची रोल्स रॉयस आहे. त्याच्याकडे ऑडी, रेंज रोव्हर, मर्सिडीज सारख्या आलिशान गाड्या आहेत.
हार्दिकने 2016 मध्ये टीम इंडियासाठी डेब्यू केला होता –
हार्दिक पांड्याबद्दल सांगायचे तर, त्याने 2016 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. हार्दिक हा संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू असून त्याने आपल्या खेळाने संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. 2024 च्या टी-20 विश्वचषकात तो टीम इंडियाचा उपकर्णधार आहे.