‘बॉयकॉट बॉलिवूड’बाबत स्वरा भास्करने केला धक्कादायक खुलासा ! म्हणाली, लोकांना यातून पैसे मिळतात…”

मुंबई – बॉलिवूडबाबत सोशल मीडियावर सुरु झालेल्या बॉयकॉट ट्रेंडमुळे अनेक चांगल्या हिडन चित्रपटांचे नुकसान झाले. कथेसह स्टारकास्ट उत्तम असूनही केवळ सोशल मीडियावरील निगेटिव्ह बब्लिसिटीमुळे चित्रपटांना फटका सहन करावा लागला. बॉलीवूडचे चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण बहिष्कार नाही, असे स्पष्ट मत अभिनेत्री स्वरा भास्करने व्यक्त केली आहे. तसेच यावेळी स्वराने सुशांत सिंह सोबत आलियाचे उदाहरण देखील दिले.
या बहिष्काराचा चित्रपटाच्या व्यवसायावर किती परिणाम होतो हे मला माहीत नाही, असे या अभिनेत्री स्वराने एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. पण सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर घराणेशाही हा चर्चेचा विषय ठरला. यानंतर आलिया भट्टला सोशल मीडियावर खूप नकारात्मक कमेंट्स मिळाल्या. त्याचवेळी आलिया भट्टचा चित्रपट सडक 2 प्रदर्शित झाला. नकारात्मक गोष्टींचा चित्रपटावर चांगला परिणाम झाला असल्याचे देखील स्वराने यावेळी सांगितले.
स्वरा पुढे म्हणाली की, यानंतरही जेव्हा गंगूबाई काठियावाडी प्रदर्शित झाला तेव्हा आलिया भट्टला खूप काही बोलले गेले, पण त्यानंतरही लोक चित्रपट पाहायला गेले आणि गंगूबाई यशस्वी झाला. बॉयकॉट होत असलेल्या असलेल्या लोकांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असल्याचे देखील स्वराने यावेळी सांगितले.
स्वरा भास्कर पुढे म्हणाली की, लोक बॉलीवूडविरोधात द्वेषपूर्ण गोष्टी पसरवून पैसेही कमवत आहेत. याचे पुरावेही आमच्याकडे असल्याचे तिने यावेळी सांगितले. यातील बहुतेक पेड लोक आहेत ज्यांना यातून पैसे मिळतात, कारण याआधी असे लोकही पाहिले गेले होते, ज्यांनी सुशांतच्या मृत्यूचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला होता.





