स्वरा भास्करने शेअर केला खास फोटो म्हणाली,”बेस्ट सौतन”

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या विधानामुळे चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तिने काही महिन्यापूर्वी फहाद अहमदशी लग्न केले. यावरूनही तिला ट्रोल करण्यात आले.
अशात, स्वरा भास्करने पती फहाद अहमदच्या खऱ्या पत्नीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच स्वराने काही फोटोही शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये काही स्वराच्या लग्नाचे आहेत तर काही फंक्शनदरम्यानचे आहे.
जिथे फहादची पहिली पत्नी प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक फंक्शनमध्ये उपस्थित होती. फहादची पहिली पत्नी दुसरी कोणी नसून त्याचा खास मित्र अरिश कमर आहे. ज्याला स्वरा त्यांची सावत्र मुलगी मानते.
स्वरा भास्करने तिच्या इंस्टाग्रामवर अरिश कमरसोबतचे काही फोटो शेअर केले, आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्रीने पोस्टला कॅप्शन दिले, ‘आमचा मित्र, कॉम्रेड आणि फहादचा जोडीदार अरिश कमरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. याशिवाय, स्वराने नेहमीच तिच्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल, तिची सर्व न्यायालयीन कागदपत्रे वेळेवर सादर केल्याबद्दल, साक्षीदार असल्याबद्दल आणि तो आतापर्यंतची बेस्ट ‘सौतन’ असल्याबद्दल त्याचे आभार मानले आहे.





