Dattatray Bharane : खात्यांची अदलाबदल! कृषी खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया समोर

Dattatray Bharane : विधान भवनात रम्मीचा ऑनलाइन डाव खेळताना दिसलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे अजित पवार यांनी कृषीखात काढलं आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार यांनी शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिड़ीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. परिणामी कोकाटे यांच्या राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर त्यांची कृषीमंत्री पदावर उचल बांगडी करण्यात आली आहे.
त्यामुळे आता अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या दत्तात्रय भरणे यांची कृषी पदावर वर्णी लागली आहे. ते राज्याचे कृषीमंत्री झाले आहेत. त्यांचे आधीचे क्रीडा आणि युवक कल्याण खाते हे माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे. थोडक्यात खात्यांची अदला बदल करण्यात आली आहे. कृषीखाते मिळाल्यानंतर नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभार मानतो.
एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली,…
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) August 1, 2025
शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. असे त्यांनी एक्स या समाजमाध्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.





