शिरोली बुद्रुक गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी स्वप्निल रोकडे, उपाध्यक्षपदी सचिन थोरवे यांची निवड

ओझर : शिरोली बुद्रुक गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी स्वप्निल जयसिंग रोकडे तर उपाध्यक्षपदी सचिन लक्ष्मण थोरवे यांची ग्रामसभेत एकमुखाने निवड करण्यात आली. १ सप्टेंबर रोजी शिरोली बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने गावाचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्षाची निवड झाली.
यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, गावचे सरपंच प्रदीप थोरवे,उपसरपंच वैशाली थोरवे, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश थोरवे, प्रसाद थोरवे, अश्विनी शेरकर, सुगंधा थोरवे, प्रथमेश थोरवे, अक्षय विधाटे, सुभाष थोरवे, अँड अविनाश थोरवे, पोलीस पाटील अमोल थोरवे, गणेश राऊत.
प्रसाद थोरवे, विष्णू थोरवे, दत्तात्रय बोऱ्हाडे,नितीन विधाटे, बाळासाहेब विधाटे, गोरखनाथ उकिर्डे, विशाल थोरवे, रणजीत शेरकर, संतोष थोरवे, नितीन थोरवे,सुशांत खैरे,मारुती सरोदे नितीन पंडित, अनिल डबडे, प्रा. राजेंद्र थोरवे, योगेश हांडे,ग्रामसभेच्या सुरुवातीस ग्रामसभेपुढे येणारे विषयाचे वाचन ग्रामसेवक कल्पना दुराफे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे आलेल्या योजने बद्दल माहिती सांगण्यात आली.
ग्रामसभेपुढे रस्त्याच्या समस्या, कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा गळती व व इतर विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. सभेमध्ये दारूबंदी विषयीचा ठराव घेण्यात आला व याविषयी पुढील कायदेशीर पूर्तता करण्याचे ठरले. सभेच्या शेवटी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीबाबत विषय मांडण्यात आला.
यावेळी सचिन थोरवे, नितीन पंडित, स्वप्नील रोकडे, विशाल थोरवे यांनी अध्यक्ष होण्याबाबत उत्सुकता दाखवली. यावेळी एक मुखाने बिनविरोध स्वप्निल रोकडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी सचिन थोरवे यांची निवड झाली.
गावच्या वतीने मावळत्या अध्यक्ष सुधीर देवणे यांचा सत्कार करण्यात आला. तर सत्यशील शेरकर, सरपंच प्रदीप थोरवे व उपस्थित ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्निल रोकडे व उपाध्यक्ष सचिन थोरवे यांचा सत्कार करण्यात आला.





