स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओकने एकमेकांना दिल्या खास शुभेच्छा…

Prasad Oak and Swapnil Joshi | मागील काही दिवसांपासून ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट चर्चेत होता. अखेर हा चित्रपट रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. स्वप्नील जोशी, सुप्रिया-सचिन पिळगावकर, अशोक सराफ, हेमल इंगळे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
अनेक कलाकार मंडळी या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. अभिनेता प्रसाद ओकेने देखील या चित्रपटासाठी स्वप्नील जोशीला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे अभिनयाच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे खास मित्र आहे.
इनस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट करत प्रसाद ओकने लिहिले की, “स्वप्नील जोशी… ‘नवरा माझा नवसाचा’ 2 बंपर विक इंड अभिनंदन भावा “असे म्हणत त्याच्या चित्रपटाला खास शुभेच्छा दिल्या. तर स्वप्नील जोशीने देखील दिग्दर्शक-अभिनेता प्रसाद ओक यांच्या आगामी ‘धर्मवीर 2’ साठी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाद्वारे दोन्ही मित्रांनी एकमेकांना आपल्या चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमाने वीकेंडला 7.84 करोड रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासून सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने 1.85 करोड रुपयांची कमाई केली.
या सिनेमात सचिन पिळगावकर यांच्याबरोबर सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाचा हा सिक्वेल आहे.




