Suraj Chavan : स्वॅग, स्टाईल अन्….; शेकी गाण्यावर सूरजने बनवला भन्नाट रील; व्हिडीओ पाहा…

Suraj Chavan : बिग बॅास ५ चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणला मोठी लोकप्रियता मिळाली. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. मात्र, बिग बॅासच्या आधाही त्याला प्रसिद्ध मिळाली ती इन्स्टाग्रावरील रीलमुळे. नुकतेच सूरजने सोशल मीडियावर ट्रेंन्ड होत असणाऱ्या एका गाण्यावर भन्नाड रील बनवला आहे. त्याच्या या रीलला त्याचे चाहते लाइक करत असून कमेंटसचा वर्षाव करत आहेत.
सोशल मीडियावर संजू राठोडच्या शेकी हे गाणं धूमाकूळ घालत आहे. या गाण्यावर अनेकजण रील बनवत आहेत. तरुणाईला तर या गाण्याने अक्षरशः वेड लावले आहे. याच गाण्यावर सूरज चव्हाणने भन्नाड व्हिडीओ तयार करत ठेका धरला आहे. त्याचा हा रील तुफान व्हायरल झाला आहे. सूरजने शेअर केलेल्या रीलमध्ये तो बाइकवर बसून आपल्या खास स्टाइलने गाडी चालवताना दिसत आहे. यावेळी पार्श्वभूमीला शेकी हे गाण वाजत आहे. या रीलमध्ये सूरजचा खास अंदाज आणि स्वॅग त्याच्या चाहत्यांना खूपच आवडली आहे.
View this post on Instagram
नुकताच सूरज चव्हाणचा झापुक झूपूक नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॅाक्स आॅफिसवर बऱ्यापैकी यश मिळाले. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. सूरजचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॅास या शोने खऱ्या अर्थाने सूरजच्या आयुष्याला कलाटणी दिली.
हेही वाचा : श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ व्हायरल; रवीना टंडन संतापून म्हणाली…





