satara | डीजी कॉलेजच्या आयबीपीएस सेंटरच्या चार विद्यार्थ्यांचे सुयश

सातारा, (प्रतिनिधी) – येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तथा आयबीपीएस सेंटरमधील विद्यार्थ्यांनी आयबीपीएस परीक्षेत यश मिळवले आहे.
प्रतिवर्षी देशातील राष्ट्रीयकृत बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स व क्लर्क भरती करिता इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातीलविद्यार्थ्यांची आयबीपीएसद्वारे अंतिम निवड करण्यात आलेली आहे.
यामध्ये हेमंत सकटे व सुरज शिंदे यांची बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे. तर विजय थोरात यांची पंजाब नॅशनल बँकेत आणि महेश जगताप यांची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लर्क म्हणून अंतिम निवड झालेली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य व सहसचिव (उच्च शिक्षण) मा. प्रिं. डॉ ज्ञानदेव म्हस्के, मा. सहसचिव (माध्यमिक) बंडू पवार उपप्राचार्य, प्रो. डॉ विठ्ठल सावंत, प्रो. डॉ गणेश जाधव,
आयबीपीएस सेंटरचे समन्वयक डॉ. विजय कुंभार, डॉ. टी. डी. महानवर, डॉ. सचिन सूर्यवंशी, प्रा. विजय पाटील, प्रा. किशोर संकपाळ, प्रा. संतोष अमंदे, प्रा. बाजीराव नरळे, कार्यालय प्रमुख अशोक मसने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





