Suvendu Adhikari : एसआयआरबाबत विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत; सुवेंदू अधिकारी यांचा आरोप
पश्चिम बंगालमधील भाजपचा विजय (Suvendu Adhikari) अजूनही पचनी न पडलेली काही प्रसारमाध्यमे निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) या प्रक्रियेबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत.

Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील भाजपचा विजय (Suvendu Adhikari) अजूनही पचनी न पडलेली काही प्रसारमाध्यमे निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) या प्रक्रियेबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांनी घेतलेले आक्षेप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. काही वर्षांपूर्वी मतदार ओळखपत्र हे आधार कार्डला संलग्न करण्याची मोहिम सरकारने उघडली होती. त्या प्रक्रियेतच इतका मोठा फरक आढळला की त्यामुळे एस आय आर मोहिम आवश्यक ठरली, असे प्रतिपदन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी केले आहे.
केरळचे उदाहरण देत अधिकारी यांनी दावा केला की, काँग्रेसने त्या दक्षिण राज्यातील निवडणुका जिंकल्यामुळे तेथील एसआयआर प्रक्रियेला पाठिंबा दिला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यामुळे ते त्याला (Suvendu Adhikari) विरोध करत आहेत. आमच्या राज्यातील एसआयआर प्रक्रियेदरम्यान २७ लाख नावे वगळण्यास भाजप किंवा निवडणूक आयोग नव्हे, तर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार होत्या.
तुम्ही त्यांना जबाबदार का धरत नाही? अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेला विरोध केल्याबद्दल बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर अधिक टीका केली. दीर्घकाळापासून चालत आलेले राजकीय वैर असूनही तृणमूल आणि सीपीआय(एम) आता एकाच सुरात बोलत आहेत.
त्यांच्यातील कथित राजकीय समझोत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी डाव्या आघाडीच्या कार्यकाळातील राजकीय हिंसाचाराच्या घटनांचाही उल्लेख केला. त्यामध्ये सैबारी आणि नंदीग्राम येथील घटनांचा समावेश आहे.






