Crime News : थबडेवाडी विहिरीत आढळला संशयास्पद मृतदेह; कवठेमहांकाळ पोलिसांची घटनास्थळी धाव
Crime News : घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.
Updated On:

सांगली : कवठेमहांकाळ ते जत मार्गालगत असलेल्या खटकाळे तलावाजवळील विहिरीत एकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृताचे नाव सुरेश भीमराव गगनमाले (वय ४२, रा. थबडेवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे आहे. खटकाळे तलावालगत असलेल्या चंदनशिवे यांच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कवठेमहांकाळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
टॅग्स:





