बेंगळुरू – पाकिस्तान मधील चिमुकलीवर भारतात यशस्वी बोन मॅरो ट्रांसप्लांट शस्त्रक्रिया पार पडली आहे. पाकिस्तान मधील दोन वर्षांच्या मुलीवर बेंगळूरूमध्ये बोन मॅरो ट्रांसप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. या चिमुकलीचे नाव अमायरा असून ती माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि कमेंटेटर सिकंदर बख्त यांची मुलगी आहे. अमायरावर बेंगळूरू येथील नारायणा हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे.
मेक्सिकोमध्ये टॅंकरच्या धडकेत ट्रेन जळून खाक, संबंधित ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात
अमायराची तब्येत सध्या ठिक आहे. अमायरावर अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणजेच बोन मॅरो ट्रांसप्लांट झाले आहे. सिकंदर बख्त यांचे कुटंब पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी आहे. बख्त यांची मुलगी अमायरा सध्या अडीच वर्षांची आहे. अमायरा हिला बंगळूरू येथील नारायणा हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अमायराला अत्यंत दुर्मिळ असा आजार होता.
अमायरावर बोन मॅरो ट्रांसप्लांट रेयर डिसऑर्डर – म्यूकोपॉलीसेकेराइडोसिस टाइप -1 (MPS I) या आजारवर उपचार सुरु होते. म्यूकोपॉलीसेकेराइडोसिस हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. हा आजार रुग्णाच्या डोळ्यांवर आणि मेंदूसह शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करतो. हा आजार असणारी बहुतेक मुलांना वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत अपंगत्व येते. त्यानंतर मृत्यूचा धोकाही असतो.