बारामती एसटी आगारातील १३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Updated On:

बारामती : संपात सहभागी असलेल्या १३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आहे. बारामती आगारातील ७ तर एमायडिसी आगारातील ६ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली आहे.
विविध मागण्यासह एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले काही दिवसांपासून सुरू आहे. दिवसेदिवस त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. बारामती आगारातील 13 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
राज्य सरकारने एसटी कर्मचार्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन केली.आहे. समितीच्या निर्णयाचा अहवाल चार आठवडयात न्यायालयात सादर करावा लागणार आहे. तोपर्यंत आमची संपावर बसण्याची तयारीआहे. अशी माहिती बारामतीआगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिली.





