Sushmita Sen : सुष्मिता सेनचा जबरा फॅन! चाहत्याची ‘ती’ पोस्ट चर्चित; अभिनेत्रीने दिला सुंदर रिप्लाय

Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या अनोख्या स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती सतत सक्रीय असते. सुष्मिताला ट्रॅव्हलिंग करण्याची प्रचंड आवड आहे. कुठेही बाहेर फिरायला गेल्यावर तिथले फोटो ती आपल्या इंन्स्टावर पोस्ट करत असते. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. यामुळे ती चाहत्यांसोबत सतत कनेक्ट राहत असते. अशाच एका तिच्या जबऱ्या फॅनने तिच्यासाठी इंन्स्टावर पोस्ट केली. ती पोस्ट सुष्मिताने तिच्या इंन्स्टावर रिशेअर केली आहे.
सुष्मिताने एक पोस्ट शेअर करत आपण लखनौ येथे येणार असल्याचे सांगितले होते. तिच्या याच पोस्टवर निक्की दुबे नावाच्या एका चाहत्याने अभिनेत्रीच्या लखनौ भेटीदरम्यान तो लखनौमध्ये नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यानंतर या पोस्टला प्रतिसाद देत सुष्मिताने हॅार्ट इमोजी शेअर करत त्याची पोस्ट रिशेअर केली.
View this post on Instagram
त्या चाहत्याने इंन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “जर मी आत्ता लखनौमध्ये असतो तर मी विमानतळापासून एक इंचही हललो नसतो. गरज पडल्यास मी रात्रंदिवस तिथेच राहीन आणि तुला भेटल्यानंतरच निघून जाईन. तुला पुन्हा कधी भेटण्याची संधी मिळेल कोणास ठाऊक.” असे म्हटले होते.
सुष्मिता सेन कामाच्या व्यस्ततेमुळे लखनऊमध्ये आली आहे. तिच्या इंस्टा स्टोरीवर एक स्टायलिश फोटो तिने शेअर करत, “लखनऊ. वर्कमोड.” असे कॅप्शन दिले आहे. सुष्मिताचा विमानतळावरचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने काळ्या रंगाचा ड्रेस वेअर केलेला दिसत आहे. पापाराझींना तिने पोज दिल्या. तसेच त्यांना पाऊस पडतोय काळजी घ्या असे आवाहनही केले.
हेही वाचा : एकदा नाही तर दहा वेळा काजोलने सहकलाकाराच्या कानाखाली मारली; ‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं?





