सुषमा अंधारे यांचा खोचक सवाल,’नागालँडमध्ये भाजप राष्ट्रवादीसोबत, आता 40 चुकार भाऊ भाजपला सोडचिठ्ठी देणार का?

मुंबई – नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपाच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर टीका केली जात आहे, . नागालँडमध्येही ५० खोके, बिलकुल ओके असं काही झालंय का? एकीकडे इथे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं असं चित्र निर्माण झालंय. ५० खोके आणि बिलकुल ओके, नागालँड ओके असं झालंय का? “असा सवाल उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. नागालँडमध्ये भाजप राष्ट्रवादीसोबत गेली त्यामुळे आता आमचे चाळीस चुकार भाऊ भाजपपासून बाजूला जाणार का? आमचे 40 चुकार भाऊ इकडून गेले. जाताना त्यांनी सांगितले की, शिवसेना राष्ट्रवादीसोबत जात आहे, त्यामुळे हिंदुत्व धोक्यात आहे. राष्ट्रवादी आम्हाला नको होती म्हणून आम्ही बाहेर पडलो.
तर आता प्रश्न पडतो की, नागालँड सरकारमध्ये राष्ट्रवादी आहे. तर भाजप बाहेर पडणार का? आणि भाजप बाहेर पडत नसेल तर याचा अर्थ आहे भाजप नकली हिंदुत्ववादी आहे? आणि जर भाजप नकली हिंदुत्ववादी आहे तर इकडचे चाळीस चुकार भाऊ भाजपपासून बाजूला जातील का? कारण भाजप आता राष्ट्रवादीसोबत गेलेली आहे. याच्यावरती त्यांना विचारलं पाहिजे, अशी प्रश्नांची सरबत्तीच सुषमा अंधारे यांनी केली.





