Sushma Andhare : सुषमा अंधारेंनी ट्विट करत मुख्यमंत्री शिंदेंना करून दिली ‘त्या’ वक्तव्याची आठवण

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकालासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी अभूतपूर्व बंड करताना, महाराष्ट्रात सत्तांतर केले. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले होते.
शिंदे हे भाजपाच्या साथीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलताना एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांपैकी एकही आमदार पडणार नाही. तसे झाल्यास मी राजकारण सोडेल असे वक्तव्य केले होते.
याच वक्तव्याचा संदर्भ घेऊन शिवसेनेच्या नेत्या यांनी यांनी पुन्हा आठवण करून द्यावी, अशा आशयाचे ट्विट करताना, मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे. उद्या विधानसभेचा निकाल असल्याने अनेक नेत्यांकडून एकमेकांना डिवचण्याचा प्रकार सुरु असून यावर प्रत्येकाकडून प्रतिक्रिया येत आहेत.





