“फडणवीसांनींच वाझेंकडून पत्र लिहून घेतलंय, लोकांना मूर्खात काढण्याचा…” ; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Sushma Andhare on Devendra Fadnavis । राज्यातील अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. कारण या प्रकरणात सचिन वाझे यांनी एन्ट्री केली असून त्यांनी थेट अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना, सचिन वाझे हे ज्या टायमिंगमध्ये बोलत आहेत, हे टायमिंग खूप महत्वाचे आहे. वाझेंना पत्रच लिहायचं होतं तर त्यांनी इतके दिवस का लिहलं नाही. पत्र लिहायचंच होतं तर तपास संस्थेला, न्यायधिकृत संस्थेला का लिहलं नाही. ते पत्र देवेंद्र फडणवीसांनांच का लिहलं? असा सवाल त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस संशयाच्या भोवऱ्यात Sushma Andhare on Devendra Fadnavis ।
सचिन वाझे म्हणजे काय हरिश्चंद्र आहे काय? ज्या सचिन वाझेंवर ढिगाने आरोप आहेत. ते आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत असेही अंधारे म्हणाल्या. भाजप वारंवार अनेक लोकांवर आरोप करते आणि त्यांनतर त्या लोकांना पक्षात घेते असे सुषमा अंधारे म्हणाल्या. फडणवीसांवर चौफेर हल्ले होतायेत, फडणवीस संशयाच्या भोवऱ्यात आहेत, फडणवीसांनी महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवली, फडणवीसांनी इथले पक्ष फोडले, फडणवीसांनी कायदा सुव्यवस्थेचा वापर जनकल्याणासाठी न करता विरोधकांनी जेरीस आणण्यासाठी केला, असे अनेक आरोप त्यांच्यावर असल्याचे अधारे म्हणाल्या. यातून फडणवीसांची सुटका करुन घेण्यासाठी फडणवीसांनीच वाझेंकडून हे पत्र लिहून घेतलं नाही हे कशावरुन हा माझा स्षष्ट आरोप असल्याचे अंधारे म्हणाल्या.
देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्यावरच वाझेंनी का पत्र लिहलं
अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेऊन जेव्हा फडणवीसांवर काही आरोप केले आहेत. आशा काळात वाझेंनी फडणवीसांना पत्र लिहलं आहे. त्यांना पत्रच लिहायचं होतं तर इतके दिवस का लिहलं नाही. पत्र लिहायचंच होतं तर तपास संस्थेला, न्यायधिकृत संस्थेला का लिहलं नाही? ते पत्र फडणवीसांनांच का लिहलं जातं असा सवाल अंधारे यांनी केलाय.
नेमकं प्रकरण काय? Sushma Andhare on Devendra Fadnavis ।
वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझे यांनी आता नवीन गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील नाव घेतले आहे. तसेच अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोपही वाझे यांनी केला आहे.
हेही वाचा





