sushant singh rajput | ankita lokhande : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोंखडेचा डेब्यू टेलिव्हिजन शो ‘पवित्र रिश्ता’ला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षानंतरही या मालिकेबद्दल प्रेक्षक भरभरून बोलतात. पवित्र रिश्ता मालिका ही अर्चना आणि मानव यांची लव्हस्टोरी होती. याच मालिकेदरम्यान अंकिता आणि सुशांत एकमेंकाच्या प्रेमात पडले होते. मात्र यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताला प्रचंड त्रास झाला. पण त्यानंतर तिच्या आयुष्यात विकी आला. पण सुशांत मात्र हे जग सोडून गेला. त्यामुळं सुशांतचे चाहते त्याच्या आठवणीत आजही पोस्ट शेअर करताना दिसतात. अभिनेत्याच्या मृत्यूला आता 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये म्हणजे आजच्या दिवशी वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं होत. सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडे हिने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. अंकिता लोखंडे हिने सुशांत याचा त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री सलेन्ट सॉग्न फोटोला दिलं असून अंकिता हिने कॅप्शन लिहिलं नाही. सोशल मीडियावर देखील नेटकरी सुशांतच्या आठवणीत भावुक झाल्याचं दिसून येत आहे.