सुशांतच्या बहिणींविरोधात रियाने दाखल केला गुन्हा; मुंबई पोलीस करणार चौकशी

मुंबई – अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सलग दुसऱ्या दिवशी अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या वतीने चौकशी करण्यात आली होती. काल सकाळी ‘एनसीबी’च्या कार्यालयात हजर झाल्यानंतर तब्बल 6 तास तिची कसून चौकशी केली गेली होती. ती ‘एनसीबी’च्या बालार्ड इस्टेट येथील कार्यालयात हजर झाली होती.
यातच मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलीस स्ठानकात सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. वांद्रे पोलीसांनी सुशांतच्या दोन बहिणी प्रियांका सिंह आणि मीतू सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही बहिणींवर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सुशांतच्या बहिणी आणि एक डॉक्टर तरुण कुमापच्या विरोधात रिया चक्रवर्तीने तक्रार दाखल केल्यानंतर 12 तासांच्या आतच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आतापर्यंत याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 7 जणांचा सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी थेट संबंध आहे. तर दोघा जणांना अमली पदार्थ विषयक गुन्ह्याच्या कायद्याखाली तपास सुरू केल्यावर अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सीबीआय आणि ईडीकडूनही रिया चक्रवर्तीची चौकशी केली गेली होती.





