Sooryavansham 2 : बाप-मुलाच्या नात्यातील दुरावा आणि प्रेम पुन्हा पाहायला मिळणार; ‘सुर्यवंशम’चा सिक्वेल येतोय? ‘त्या’ पोस्टची सगळीकडे रंगली चर्चा

Suryavansham | amitabh bachchan : बॉलिवूडचे शेहनाशह अमिताभ बच्चन यांनी आता पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण त्यांच्या एका चित्रपटाची चर्चा आजची पिढीदेखील करताना दिसते. तो चित्रपट म्हणजे ‘सुर्यवंशम’. 21 मे 1999 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सात कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने त्यावेळी 12 कोटी 65 हजारांचा गल्ला जमवला होता.
अमिताभ बच्चन यांचा चित्रपटात डबल रोल होता. सूर्यवंशम हा सिनेमा 1997 मध्ये आलेल्या तामिळ सिनेमा ‘सूर्यवमसम’चा रिमेक होता. ‘सेट मॅक्स’ या वाहिनीने हा चित्रपट अजरामर केला आहे. यामुळेच सोशल मीडियावर हा चित्रपट नेहमी चर्चेत असतो. बाप-मुलाच्या नात्यात असलेला दुरावा आणि प्रेम यामुळे आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
नुकतंच या सिनेमाबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे हा चित्रपट सोनी मॅक्स वाहिनीवर टीव्हीवर येतो. आता मॅक्सची सोशल मीडियावर एक पोस्ट समोर आली आहे, त्यानंतर ‘सूर्यवंशम’च्या सिक्वेलबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
सोनी मॅक्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टर शेअर करण्यात आली आहे, ज्यावर ‘सूर्यवंशम 2’ लिहिले आहे. पोस्टवर असेही लिहिले आहे की, “हिरा पुन्हा चमकेल. ट्रेलर लवकरच येत आहे.” आता सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे की या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. मात्र, अमिताभ बच्चन किंवा निर्मात्यांनी अद्याप अशी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
चॅनेलने आणखी काय म्हटले?
चॅनेलने त्यांच्या पोस्टला कॅप्शन दिले आहे, “तुम्ही येताना पाहिले नसेल, पण ते येत आहे. भानू प्रताप सिंह आणि हीरा ठाकूर यावेळी नव्याने सुरुवात करतील की त्यांच्या नात्यात तडा जाईल? जाणून घेण्यासाठी थोडी वाट पहा. ‘सूर्यवंशम 2’ फक्त सोनी मॅक्सवर येत आहे.”
आता सोनी मॅक्सच्या या पोस्टचा अर्थ काय? ‘सूर्यवंशम’चा सिक्वेल खरंच येणार आहे का? किंवा कदाचित या पोस्टचा काही वेगळा अर्थ असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे भविष्यातच मिळतील.
कुठं झालं संपूर्ण सिनेमाचं शुटिंग?
या चित्रपटाचं शूटिंग गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील ‘बलराम पॅलेस’ मध्ये झालं होत. ही जागा, सर्वात प्राचीन आणि पौराणिक ठिकाणांपैकी एक आहे. आज हा राजवाडा बलराम महल या नावाने ओळखला जातो. यामध्ये आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. हा राजवाडा पाहण्यासाठी लांबून लोक येतात.
बलराम पॅलेस 100 वर्ष जुना आहे. अनेक वर्षापूर्वी पालनपूर नवाब तल्ले मोहम्मद खान यांनी आपल्या राणीसाठी हा महाल बांधला होता. शहराच्या गोंगाटात शांत वातावरणात हे राहण्यासाठी बांधले गेले होते. या पॅलेसला सर्वोत्कृष्ट हेरिटेज हॉटेल म्हणून चार पुरस्कारही मिळाले आहेत.





