Suryakumar Yadav Reaction : ‘काहीतरी नवीन बोला यार!’ सँटनरच्या ‘कमिन्स स्टाईल’ आव्हानावर सूर्याने घेतली फिरकी, पाहा VIDEO
Suryakumar Yadav Reaction : भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सँटनरचे हे आव्हान फारसे गांभीर्याने न घेता त्याला मजेशीर टोला लगावला आहे.

Suryakumar Yadav reaction on Mitchell Santner statement : रविवारी (८ मार्च रोजी) होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी मैदानाबाहेरील वातावरण तापले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने २०२३ मधील पॅट कमिन्सच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय प्रेक्षकांना शांत करण्याचा इशारा दिला. मात्र, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सँटनरचे हे आव्हान फारसे गांभीर्याने न घेता त्याला मजेशीर टोला लगावला आहे.
नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेत मिचेल सँटनर म्हणाला, “आमचे मुख्य लक्ष्य अहमदाबादमधील विराट प्रेक्षकवर्गाला शांत करणे हेच आहे. टी-२० मध्ये काहीही घडू शकते. घरच्या मैदानावर खेळताना भारतावर प्रचंड दडपण असेल आणि त्याचा फायदा उठवत आम्ही धक्का देऊ शकतो.” सँटनरचे हे विधान २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलपूर्वी पॅट कमिन्सने केलेल्या विधानाची आठवण करून देणारे होते.
सूर्याचे ‘मिश्किल’ प्रत्युत्तर –
सँटनरच्या या विधानावर सूर्याला विचारले असता तो म्हणाला, “अरे यार, सगळे तेच तेच वाक्य का बोलत आहेत? त्यांनी किमान काहीतरी नवीन बोलण्याचा प्रयत्न करायला हवा.” सूर्याच्या या उत्तराने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. सूर्याने पुढे स्पष्ट केले की, भारतीय संघ या दडपणाचा विचार करण्याऐवजी घरच्या मैदानावर फायनल खेळण्याचा आनंद घेत आहे.
🚨SURYAKUMAR YADAV REPLY SANTNER STATEMENT.🚨
Q🎙️: Final feelings? And Santner’s “silence the crowd” comment?
Surya🎙️-“Wahi same line bol rahe hain sab, kuch naya bolne do. But honestly, the mood in our camp is very relaxed and happy. 😅 pic.twitter.com/jBo3ytJOMb
— Sam (@Cricsam01) March 7, 2026
ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण –
🚨BOLD STATEMENT BY MITCHELL SANTNER ON INDIA.🚨
Q 🎙️ : Are you ready to break a billion hearts to win the trophy?
Mitchell Santner🎙️: “We may not be favourites, but if we play well as a team, we can win it — even if it means breaking a few hearts.”🤯 pic.twitter.com/xH8tcf7n4J
— Sam (@Cricsam01) March 7, 2026
सूर्याने संघातील वातावरणाबद्दल सांगितले की, “ड्रेसिंग रूममधील वातावरण सध्या अत्यंत सकारात्मक आणि खास आहे. सर्व खेळाडू उत्साहात असून आम्ही या मोठ्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.” भारताला २०२३ च्या पराभवाची सल असली, तरी यावेळी संघ नव्या उर्जेने मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे सूर्याच्या देहबोलीतून स्पष्ट झाले.
एकूण टी-२० सामन्यांत भारत वरचढ –
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटचा विचार केला, तर भारतीय संघाचे पारडे जड वाटते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण ३० सामने झाले असून त्यापैकी १८ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे (यात दोन विजय सुपर ओव्हरमधील आहेत). तर ११ सामन्यांत न्यूझीलंडने बाजी मारली आहे. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारतीय भूमीवरही टीम इंडिया १६ पैकी ११ सामने जिंकले आहेत.





