Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा; ‘या’ अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

Suryakumar Yadav : सोशल मीडियावर आपल्या बोल्ड स्टेटमेंट्स आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जीने नुकत्याच एका मुलाखतीत भारतीय टी-20 टीमच्या कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नावाने सनसनाटी खळबळ उडवून दिली आहे. एका प्रसिद्ध बॉलीवूड चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुशीने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे करताना थेट सूर्यकुमार यादवचा उल्लेख केला, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
खुशी मुखर्जीने दावा केला की, “अनेक क्रिकेटर्स माझ्या मागे होते. सूर्यकुमार यादव मला खूप मैसेज करायचे, पण आता आमचे फारसे बोलण होत नाही.” तिने पुढे स्पष्ट केले की, “मला कोणत्याही क्रिकेटरला डेट करायचे नाही. मला माझे नाव कोणासोबतही जोडले जाणे आवडत नाही. मी लिंक-अप्समध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही.” या विधानाने सोशल मीडियावर वादळ उठले असून, चाहते आणि नेटकरी यांच्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
सूर्यकुमार यादव हा भारतीय क्रिकेट टीमचा यशस्वी टी-20 कर्णधार असून, तो वैयक्तिक आयुष्यातील बाबींमुळे क्वचितच चर्चेत येतो. या दाव्यावर अद्याप सूर्यकुमार यादव किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
खुशी मुखर्जी केवळ या दाव्यामुळेच नव्हे, तर यापूर्वीच्या काही घटनांमुळेही वारंवार चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या घरातून २५ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा आरोप तिने प्रथम घरगुती मदतनीसवर केला होता. मात्र नंतर तिने खुलासा केला की, तिच्या जवळच्या मित्रांनीच तिला गुंगीचे औषध देऊन ही चोरी केली.
“जेव्हा यशामुळे मित्रांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते आणि ते शत्रू बनतात, तेव्हा असे प्रकार घडतात,” असे म्हणत तिने आपले दुःख व्यक्त केले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, खुशीने कायदेशीर कारवाई करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
कोलकात्यात जन्मलेली आणि कॅनडात लहानाची वाढलेली खुशी मुखर्जी सध्या २९ वर्षांची आहे. तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात २०१३ मध्ये तमिळ चित्रपट ‘अंजल थुराई’ने झाली. मात्र तिला खरी ओळख एमटीव्ही स्प्लिट्सविला सीझन १०, लव्ह स्कूल आणि बालवीर रिटर्न्स सारख्या रिॲलिटी शो तसेच टीव्ही मालिकांमधून मिळाली. ती बोल्ड वेब सीरीज आणि सोशल मीडिया कंटेंटद्वारेही लोकप्रिय आहे. आपल्या बेबाक अंदाज आणि बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाणारी खुशी नेहमी विवादांचा केंद्रबिंदू ठरते. या नव्या वादामुळे क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात एकच खळबळ माजली आहे.





