MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

MI vs DC Suryakumar Yadav equals Temba Bavuma’s record : सूर्यकुमार यादवच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला १८१ धावांचे लक्ष्य दिले. दरम्यान या खेळीच्या जोरावर सूर्याने एक नवा आणि महान विक्रम रचला आहे. जो अद्याप कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावुमाने हे निश्चितच एकदा केले असले, तरी आता सूर्यकुमार यादवने त्याची बरोबरी केली आहे. मात्र, सूर्या कमी कालावधीत हा खास पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.
सूर्या हा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज –
आतापर्यंत टी-२० क्रिकेटच्या इतिहासात, टेम्बा बावुमा हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने सलग १३ डावांमध्ये २५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने २०१९ ते २०२० या काळात हा पराक्रम केला होता, पण आता सूर्यकुमार यादवने त्याची बरोबरी केली आहे. सूर्या एका वर्षात सर्वाधिक वेळा सलग २५ धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादवने या वर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये किमान २५ धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला फलंदाज ठरला आहे.
सूर्याने ४३ चेंडूंत साकारली ७३ धावांची वादळी खेळी –
Suryakumar Yadav – Player of the Season.#SuryakumarYadav #DCvsMI pic.twitter.com/d0qn7D0Jgp
— GSMS Media (@GsmsMedia) May 21, 2025
ब्रॅड हॉज, जॅक रुडॉल्फ, कुमार संगकारा, ख्रिस लिन आणि काइल मेयर्स यांनी आतापर्यंत ११ वेळा हे केले आहे. आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावांची खेळी साकारली. या दरम्यान नमन धीरने उत्तम साथ दिली. त्याने ८ चेंडूंत दोन षटकार आणि तितक्याच चौकारांच्या जोरावर नाबाद २४ धावांची वेगवान खेळी केली. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन तर दुष्मंथ चामीरा, मुस्तफिजूर रहमान आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मावर आयपीएल २०२५ नंतर होणार शस्त्रक्रिया, ५ वर्षांपासून ‘या’ समस्येने त्रस्त
सूर्यकुमार यादव ऑरेंज कॅपच्या शर्यतीत –
विशेष म्हणजे यावर्षीच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव देखील ऑरेंज कॅपसाठी आपला दावा करत आहे. जरी या बाबतीत साई सुदर्शन पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत ६१७ धावा केल्या आहेत, तर शुबमन गिल ६०१ धावा करून दुसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु सूर्यकुमार यादव (५८३) देखील त्याच्या मागे नाही. जर सूर्याच्या बॅटमधून अजून एक मोठी खेळी आली, तर तो पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचेल.





