IND vs PAK : सूर्याचा मोठा निर्णय! सशस्त्र दल आणि पहलगाममधील पीडित कुटुंबांना देणार तब्बल ‘इतके’ कोटी

Suryakumar Yadav Donates Asia Cup Match Fees : रविवारी दुबईत झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाने विक्रमी नवव्यांदा आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरला. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक मोठा निर्णय चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्याने आशिया कप स्पर्धेतील आपली सूंपूर्ण मॅच फी भारतीय सैन्य आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना दान करण्याची घोषणा करून सर्वांचे मन जिंकले.
सूर्यकुमारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लिहिले, “या स्पर्धेतील माझी संपूर्ण मॅच फी सशस्त्र दल आणि पहलगाममधील पीडित कुटुंबांना मदत म्हणून दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही नेहमी माझ्या स्मरणात राहाल.” त्याचबरोबर विजेतेपद पटकावल्यानंतर माध्यमांशी बोलताना सूर्या म्हणाला, “मी वैयक्तिकरित्या माझ्या सातही सामन्यांची फी सैन्य आणि गरजूंना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा थोडी उशिरा झाली, पण माझा हेतू नेहमीच समाज आणि देशाच्या मदतीचा आहे.”
सूर्यकुमार ने एशिया कप की अपनी पूरी मैच फीस भारतीय सेना को सौंप दी है। बस #BCCI भी इतना ही कर दे कि एशिया कप से मिला पूरा पैसा सेना के नाम कर दे। शायद उसके पाप कुछ कम हो सकें और देश उसे माफ कर दे।#SuryakumarYadav #AsiaCup2025 #INDvsPAK pic.twitter.com/gLFEkqqQHl
— Mukesh Mathur (@mukesh1275) September 29, 2025
अहवालानुसार, प्रत्येक भारतीय खेळाडूला एका टी-20 सामन्यासाठी 4 लाख रुपये मिळतात. सूर्यकुमारने स्पर्धेतील सर्व सात सामने खेळले, त्यामुळे त्याची एकूण 28 लाख रुपयांची मॅच फी दान केली जाणार आहे. या कृतीने सूर्यकुमारने केवळ खेळातील भावनाच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीचेही दर्शन घडवले.
हेही वाचा – आशिया कपमध्ये ‘अदृश्य ट्रॉफी’सह सूर्यकुमार यादवचे अनोखे सेलिब्रेशन ; त्याच्या सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा
फायनलमध्ये भारताचा दमदार विजय –
अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत केले. तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले, तर संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या विजयासह भारताने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानवर मात करत दुसरा टी-२० एशिया कप आणि एकूण नववा आशिया कप विजेतेपद आपल्या नावे केला.
हेही वाचा – IND vs PAK : तिलक वर्माने विराटला मागे टाकत रचला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
ट्रॉफी स्वीकारण्यास भारताचा नकार –
फायनलनंतरही वाद कायम राहिला. भारतीय संघाने एसीसी प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. भारतीय संघाला ट्रॉफी एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरुनी यांच्याकडून हवी होती, परंतु नक्वी यांनी हा प्रस्ताव फेटाळला. प्रतीक्षेनंतर आयोजकांनी ट्रॉफी मंचावरून हटवली. असे समजते की, नकवी ट्रॉफी आणि पदके आपल्या हॉटेलवर घेऊन गेले, ज्यामुळे वाद आणखी वाढला आहे.





