Suryakumar Yadav : सूर्याचा मोठा धमाका! मिळवला नंबर-१ चा मुकुट, टी-२० मध्ये केला ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम

सूर्याने मोडला आदित्य तरेचा मोठा विक्रम –
आपल्या 32 धावांच्या खेळीत चार चौकार मारत सूर्यकुमार यादवने मुंबईसाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने आदित्य तरेचा जुना विक्रम मोडला आहे. या खेळीसह सूर्याने मुंबईसाठी 71 सामन्यांमध्ये 1717 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी आदित्य तरेने 1713 धावांसह अव्वल स्थान पटकावले होते.
Kudos to Suryakumar Yadav, the new highest run-scorer for Mumbai in T20 cricket 🔥
He surpasses Aditya Tare’s record with 1,717 runs – built over 71 matches at a superb 145.38 strike rate, including 9 half-centuries.
Consistency, flair, and leadership: the hallmarks of Surya’s… pic.twitter.com/p1Ed4hK9hc
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 5, 2025
फलंदाजांची निराशा ठरली पराभवाचे कारण –
या सामन्यात केरळच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कर्णधार संजू सॅमसनने 46, विष्णू विनोदने 43 आणि अखेरीस सैफुद्दीनने 15 चेंडूंमध्ये 35 धावा फटकावत संघाला 178 धावांपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. सर्फराझ खानने एकट्याने झुंज देत 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली.
हेही वाचा – ICC Nomination : विश्वचषक विजेती नायिका शफाली वर्माला ICC प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन!
मात्र, अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव (प्रत्येकी 32 धावा) मोठी खेळी करू शकले नाहीत. कर्णधार शार्दुल ठाकूर शून्यावर बाद झाला, तर शिवम दुबेने केवळ 11 धावा केल्या. मुंबईची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. ज्यामुळे मुंबईचा संघ केवळ 163 धावातच गारद झाला आणि त्यांना 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईच्या पराभवाचे मुख्य कारण त्यांची खराब फलंदाजी ठरली.





