Suryakumar Yadav Baby : सूर्यकुमार यादव बनला ‘बाप’माणूस; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गूड न्यूज
Suryakumar Yadav Baby : सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सूर्या बाबा झाला आहे!

Suryakumar Yadav and wife Devisha welcome a baby girl : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सूर्या बाबा झाला आहे! त्याची पत्नी देविशा शेट्टी हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, सूर्याने स्वतः सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी –
सूर्यकुमारने आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत म्हटले की, “खळखळून हसण्या-खेळण्यासोबत आणि साकारायच्या स्वप्नांसोबत- आम्ही आमच्या मुलीचं स्वागत करतो.” या बातमीनंतर क्रिकेट विश्वातून सूर्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या सूर्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून तो मुंबईच्या संघासोबत रायपूरला रवाना झालेला नाही.
With giggles, bows, and dreams to unfurl- we welcome our baby girl 🩷🧿 pic.twitter.com/NlvE2tJdJw
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) May 7, 2026
आरसीबीविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता –
एकीकडे सूर्याच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे वातावरण असले, तरी मुंबई इंडियन्ससाठी मात्र ही चिंतेची बाब ठरू शकते. १० मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात सूर्यकुमार खेळण्याची शक्यता कमी आहे. हार्दिक पंड्या आधीच संघाबाहेर असल्याने गेल्या सामन्यात सूर्यानेच नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. आता जर सूर्याही या सामन्यात खेळला नाही, तर मुंबईला फलंदाजी आणि कप्तानी अशा दोन्ही आघाड्यांवर मोठा फटका बसू शकतो.
खराब फॉर्ममधून जातोय सूर्या –
आयपीएल २०२६ चा हा हंगाम सूर्यकुमारसाठी आतापर्यंत म्हणावा तसा चांगला राहिलेला नाही. जगातील सर्वात खतरनाक फलंदाज मानल्या जाणाऱ्या सूर्याने या हंगामातील १० सामन्यांत केवळ १९.५० च्या सरासरीने १९५ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत आधीच पिछाडीवर आहे, अशा परिस्थितीत सूर्यासारख्या अनुभवी खेळाडूचे संघाबाहेर असणे मुंबईसाठी ‘दुहेरी झटका’ मानला जात आहे.





