सूर्यकुमार व इशानकडे अफाट गुणवत्ता – सचिन
Updated On:

अहमदाबाद – मुंबईचा नवोदित सूर्यकुमार यादव आणि नवोदित इशान किशन यांच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, असे प्रमाणपत्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिले आहे.
या दोघांचा खेळ व खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूपच सकारात्मक आहे. त्यांनी मिळालेली प्रत्येक संधी आपल्या खेळाने यशस्वी ठरवली. या दोघांकडे तंत्रही आहे, आक्रमकता देखील आहे पण त्याही पेक्षा महत्त्वाची जिद्दही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे येत्या काळात ते भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज बनलेले दिसतील, असा विश्वासही सचिनने व्यक्त केला.
या दोघांचा खेळ मी आयपीएल स्पर्धेत तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाहिला आहे. त्यांच्याकडे स्विंग गोलंदाजी खेळण्याची क्षमता तर आहेच पण प्रत्येक चेंडूवर धावा होऊ शकतात असा विश्वासही आहे. त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याची साक्ष पटते, असेही सचिन म्हणाला.





