Seema Haider Video : सचिनला ‘लप्पू’ म्हणणाऱ्या मिथिलेश भाभीचा नवा व्हिडिओ समोर: सीमा हैदर म्हणाली…

सीमा हैदर हे नाव ऐकताच सर्वांना तिची आणि सचिनची प्रेमकहाणी आठवते. ज्याने भारत आणि पाकिस्तान या दोन शत्रुराष्ट्रांच्या सीमा ओलांडल्या. पाकिस्तानातून चार मुलांसह पळून आलेली सीमा सचिनसाठी भारतात आली आणि आता ती त्याच्या मुलाची आईही बनली आहे. नुकतेच त्यांना एक मुलगी झाली, जिचे नाव मीरा ठेवण्यात आले आहे. या मुलीमुळे सीमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तर सचिनला ‘लप्पू’ म्हणणाऱ्या मिथिलेश भाभीचाही नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ खुद्द सीमा हैदरने तिच्या सोशल मीडियावर शेयर केला आहे.
मिथिलेश भाभी पुन्हा चर्चेत
मिथिलेश भाभी ही तीच व्यक्ती आहे, जिने सीमा पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर सचिनबद्दल अनेक टीका केल्या होत्या. तिने सचिनला ‘लप्पू शक्ल का’ म्हटले होते आणि त्याला बोलताही येत नाही, असेही म्हटले होते. त्यावर सीमाने तिला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. आता सीमा आई बनल्यानंतर मिथिलेश भाभीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती म्हणते, “मी सचिनला लप्पू म्हटलं होतं, नामर्द थोडीच म्हटलं होतं. एक पुरुष आणि स्त्री एकत्र असतील तर मुलं नाही तर काय होणार?”
View this post on Instagram
सीमाचे भाभीला सणसणीत प्रत्युत्तर
सीमा हैदरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून हा भाभीचा व्हिडिओ शेयर करत लिहिले आहे, “आमच्याशी या बाईला काय वैर आहे…” यातून सीमाने पुन्हा एकदा मिथिलेश भाभीला जोरदार टोला लगावला आहे. आता लोकांना मिथिलेश भाभीकडून पुढील प्रतिक्रियेची उत्सुकता लागली आहे.
मुलीचे नामकरण मोठ्या थाटात
काही दिवसांपूर्वीच सीमा आणि सचिनने त्यांच्या मुलीचे नामकरण केले. यासाठी मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. पंडितांच्या उपस्थितीत हवन झाले आणि त्यानंतर लोकांना जेवण देण्यात आले. या नामकरण सोहळ्याचे व्हिडिओ सीमा हैदर तिच्या सोशल मीडियावर शेयर करत आहे. यावेळी सचिन कुर्त्यात दिसला, तर सीमा नेहमीप्रमाणे साडीत सुंदर दिसत होती.





