Suruchi and Piyush Ranade : सुरुची आणि पियुष रानडे झाले आई-बाबा; नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिली आनंदाची बातमी
Suruchi and Piyush Ranade : सुरुचीच्या या पोस्टवर अनेकांकडून कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव

Suruchi and Piyush Ranade : अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडे आई-बाबा झाले आहेत. सुरुचीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या मुहुर्तावर सुरुची आणि पियुषच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे.
सुरुचीने इनस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर लिहिले आहे, “अतिशय आनंदाने आणि अभिमानाने संपूर्ण जगाला हे कळवण्यास आनंद होत आहे की आम्हाला मुलगी झाली आहे.” सोबतच सुरुचीने लिहिले, “आतापर्यंत टीममध्ये आम्ही दोघेच होतो. आता आयुष्याने आम्हाला आमचा सर्वात सुंदर सहकारी दिला आहे.”
View this post on Instagram
सुरुचीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत अभिनंदन केले आहे. नम्रता संभेराव, श्रेया बुगडे, ऐश्वर्या नारकर, अद्वैत दादरकर, शर्वरी कुलकर्णी, पल्लवी वैद्य, अभिजीत खांडकेकर, गिरिजा प्रभू अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याबरोबरच, अनेक चाहत्यांनीही कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर जवळपास ३ वर्षांनी सुरुची आणि पियुष आई-बाबा झाले आहेत. दरम्यान, सुरुची प्रेग्नंट असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या, पण त्या दोघांनाही याबाबत अधिकृतरित्या जाहीर केले नव्हते. आता त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत मुलगी झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.





