गडचिरोलीत 8 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण
Updated On:

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात 8 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलवादीने पोलीस आणि सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले आहे.
रिना नरोटे उर्फ ललिता ही टेलर टीमची कमांडर होती आणि सीपीआय (माओवादी) च्या संपूर्ण गडचिरोली विभागात रसद पुरवण्याची जबाबदारी तिच्यावर होती, असे पोलिसांनी एका प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्याच्या धोरणांतर्गत नरोटे यांना 5.5 लाख रुपये मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.





