“धनूभाऊ, काय होतास तू काय झालास तू…” ; सुरेश धस यांची पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर टीका

Suresh Dhas On Dhananjay Munde । बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले. मात्र हे आरोप मुंडेंनी फेटाळून लावले तरी आता पुन्हा एकदा भाजप आमदार सुरेश धस यांनी “काय होतास तू काय झालास तू म्हणत ” धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी,”माझ्या बूथ प्रमुखाची हत्या झाली. संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता. त्यामुळे मी या प्रकारात जास्त सहभागी आहे. धनंजय मुंडे तुम्ही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात समर्थन देत आहात का? आणि गोपीनाथ गडावरून हे बोलता? तुम्ही कोणत्या दुनियेत वागताय? तुमची स्टाईल कशी आहे धनु भाऊ? तुम्हाला सिरियसनेस काय आहे, हे गँग ऑफ वासेपूर आहे असे म्हणत टीका केली आहे.
“काय होतास तू काय झालास तू…” Suresh Dhas On Dhananjay Munde ।
पुढे सुरेश धस यांनी” माधव जाधव प्रकरणात त्याची काय चूक होती. कोठे गुन्हे दखल केले जात आहे? डॉक्टर वर गुन्हा दाखल केला हे खरं आहे का? आता र्यंत किती प्रकरण झाले? बबन गित्ते खरचं आरोपी होता का? परळीत सांगतो या प्रकरणात किती आरोपी होते, या प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष देणार नाही. धनंजय मुंडे आधी असे नव्हते काय होतास तू काय झालास तू, असे म्हणत सडकून टीका केली.
मुख्यमंत्र्यांनी, अजित पवारांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे Suresh Dhas On Dhananjay Munde ।
त्यासोबतच सुरेश डास यांनी “छोटा आका आत गेला असून कराड 302 चे प्रमुख सूत्रधार आहेत. अराजकता परळीत जाऊन पहा, काय अवस्था आहे. यांना लवकर अटक करावी. एसआयटी स्थापन होईल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावे किंवा अजितदादांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे. मागचे पालकमंत्री होते त्यांनी पालकमंत्री पद आणि मंत्रीपद भाड्याने दिले होतं. मी पण 28 तारखेच्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे. मी घाबरत कोणालाच नाही. अका 302 मध्ये सुध्दा आहे. परळीतील डूबे प्रकरणात आरोपी कोणता दाखलवा? किती पैसे देवून प्रकरण मिटले हे समोर येईल. ते परळीतील लोक सुद्धा मला भेटणार आहेत. मी 1999 पासून आमदार आहे. त्यामुळे हे वागणं कुठलं आहे? काही रेकॉर्डिंग व्हायरल करा, पिस्तुलच्या लायसनला परवानगी कुणाची? हे लायसन रद्द करा “अशी मागणीही सुरेश धस यांनी केली आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवी खुनाच्या प्रकरणात बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती केली आहे. काल रात्री मी एसआयटी संदर्भात विचारणा केली आणि मुख्यमंत्री यांनी कालच पत्रावर सही केली. त्यामुळे लवकरच एसआयटी स्थापन होईल. संतोष देशमुख हत्या अमानवी घटना घडली आहे. मी न्यायालयाचे आभार मानतो. आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्यासाठी गती मिळेल. आयजी लेवलचे अधिकारी, ज्युडिशिअल तपासणी होणार यासाठी मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले आहे.” अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.





