suresh dhas । बीड हत्याकांडप्रकरणी सीआयडी, पुन्हा एसआयटी आणि आता न्यायालयीन चौकशी सुरू झाल्याने आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच, खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपासावर समाधान व्यक्त केलं आहे. दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनीही मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे म्हटले. तसेच वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली यांनी केलेल्या आरोपावर आपले स्पष्टीकरण दिले. ती माझी बहीण, त्या माऊलीवर बोलणार नाही suresh dhas । वाल्मिक कराडच्या पत्नीने आमदार सुरेश धस यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलण्यास धस यांनी स्पष्टपणे नकार दिला. याविषयी बोलताना त्यांनी, “त्या माझी भगिनी आहेत, त्यांवर मी काही बोलणार नाहीत. माझ्याबाबत व्हिडिओ वगैरे काही सापडू शकत नाही, लई धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलोय, माझं काहीही व्हिडिओ, फिडिओ सापडणार नाही. मला त्या माऊलीवर काहीही बोलायचं नाही, ती माझी बहीण आहे. त्या माऊलीवर मी बोलणार नाही, त्यांच्याकडील पुरुष मंडळीने काही बोलले तर मी बोलणार, आकाच्या आकाने बोललं तरी मी बोलेन, असे म्हणत वाल्मिक कराडच्या पत्नीने केलेल्या आरोपवर सुरेश धस यांनी म्हटले. आम्ही राजकारणी, आम्ही काहीही बोलू, पण suresh dhas । खंडणीला आडवा आला म्हणून संतोषची हत्या झाली, एसआयटी हेच म्हणते. आम्ही राजकारणी आहोत, आम्ही काहीही बोलू, पण एसआयटी हेच सांगत आहे की, खंडणीच्या आडवा आला म्हणून त्याला संपवला, असेही सुरेश धस यांनी म्हटले. राष्ट्रवादीवर मी काय बोलू पुढे बोलताना सुरेश धस यांनी,”राष्ट्रवादीवर मी काय बोलू, माझ्यासारख्या पामराने त्यांवर काय बोलावे. त्यांच्यावर दबाव आहे की नाही हे मी कसे सांगणार, त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांनी तो निर्णय घ्यावा’, असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसदर्भात बोलताना म्हटले. हेही वाचा जगातील शक्तिशाली देशात अमेरिका अव्वल ! ब्रिटन, फ्रान्सला मागे टाकत भारत पोहचला ‘या’ क्रमांकांवर ; वाचा संपूर्ण यादी