Surendra Gadling : सुरेंद्र गडलिंग यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
सुरेंद्र गडलिंग (Surendra Gadling) यांना त्यांच्या दीर्घकाळ तुरुंगवासाच्या आणि नजीकच्या भविष्यात खटल्याची सुनावणी सुरू न होण्याची शक्यता या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला.

Surendra Gadling : एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कार्यकर्ते सुरेंद्र गडलिंग (Surendra Gadling) यांना त्यांच्या दीर्घकाळ तुरुंगवासाच्या आणि नजीकच्या भविष्यात खटल्याची सुनावणी सुरू न होण्याची शक्यता या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. गडलिंग यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी करत होते.
न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणातील इतर सर्व आरोपी आधीच जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे त्यांनाही समानतेने तोच दिलासा दिला पाहिजे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले सर्व आरोपी आता जामिनावर (Surendra Gadling) बाहेर आहेत.
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या मेळाव्यात दिलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांप्रकरणी, नामवंत वकील, कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांसह किमान १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार (Surendra Gadling) भडकला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी या मेळाव्याला माओवाद्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. नंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला.
या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये वरवरा राव, सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, व्हर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा, शोमा सेन, गौतम नवलखा, सुधीर ढवळे, रोना विल्सन, ज्योती जगताव आणि महेश राऊत यांचा समावेश आहे.






