Surbhi Jyoti : अभिनेत्री सुरभी ज्योतीने दिली गुडन्यूज; लग्नाच्या दीड वर्षानंतर होणार आई
Surbhi Jyoti :
Surbhi Jyoti : अभिनेत्री सुरभी ज्योतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सुरभीच्या घरी आता एका नव्या सदस्याचे आगमन होणार असून लवकरच ती आई होणार आहे.
दरम्यान, २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरभीने अभिनेता सुमित सूरीबरोबर लग्नबंधनात अडकली. सुरभी व सुमित यांचा शाही विवाह सोहळा उत्तराखंडच्या जिम कॉर्बेटमधल्या आहाना रिसॉर्टमध्ये पार पडला. आता लग्नाच्या दीड वर्षानंतर या जोडप्याच्या आयुष्यात नवा पाहूणा येणार आहे. नुकताच सुरभीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची बातमी दिली आहे.
या फोटोसोबत अभिनेत्रीने एक खास कॅप्शनही लिहिले आहे, “आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर प्रवास आता सुरू होणार आहे. आपलं छोटंसं गोड बाळ या जूनमध्ये येणार आहे.” तिने शेअर केलेला हा फोटो खूप चर्चेत असून टीव्ही कलाकार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.Surbhi Jyoti
View this post on Instagram
कोण आहे सुरभी ज्योती?
सुरभी ज्योती ही हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कबूल है’मध्ये जो याच्या भूमिकेत ती झळकली. याशिवाय तिने ‘नागिन’, ‘गुनाह’ आणि ‘कोई लोट के आया है’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Surbhi Jyoti
हेही वाचा:





