‘सुरक्षेने विमानतळावर अडवताच शाहरुख खानने केले असे काही …’ व्हिडिओ झाला व्हायरल

no entry movie – किंग शाहरुख खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार आहे. अभिनयासोबतच शाहरुख त्याच्या नम्र स्वभावासाठीही ओळखला जातो. अलीकडेच तो मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी संयमाने वाट पाहत होता. किंग खानच्या या स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Baadshah on the Move!🛫 SRK looks dapper as he walks into the Mumbai Airport!🔥@iamsrk #ShahRukhKhan #SRK #Dunki pic.twitter.com/9YGUPPMtEw
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) November 30, 2023
शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत विमानतळ परिसरात पोहोचला होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहे, ज्यामध्ये तो पूर्णपणे काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. त्याने काळ्या पँटसोबत काळ्या रंगाचे जाकीट घातले, काळ्या शेड्स आणि हेअर बँडने किंगने लूक पूर्ण केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी संयमाने वाट पाहत आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख लवकरच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी ‘डिंकी’ चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आणि पहिले गाणे रिलीज करण्यात आले, ज्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.पठाण आणि जवान नंतर शाहरुख खानचा या वर्षात येणारा हा तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेल, अशी अपेक्षा आहे. डंकी 21 डिसेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि विकी कौशल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याची मोठ्या पडद्यावर प्रभासच्या सालारशी स्पर्धा होणार आहे.





