Revati Sule Marriage: सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न ठरलं; होणारा जावई कोण? रेवती होणार नागपुरची सून
Revati Sule Marriage : सारंग अरुण लखानी असे सुप्रिया सुळे यांच्या जावयाचे नाव असून ते नागपूरचे आहेत.

Revati Sule Marriage : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी असे सुप्रिया सुळे यांच्या जावयाचे नाव असून ते नागपूरचे आहेत. नुकतेच सोशल मिडियावर पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
सुप्रिया सुळेंचा होणारे जावई सारंग लखानी कोण आहेत?
सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
सारंग अरुण लखानी नागपूरचे आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची माहिती आहे. Revati Sule Marriage
Pune News : टिळक अभिरुप राष्ट्रीय न्यायालय स्पर्धेत चव्हाण महाविद्यालय विजेते
कोण आहेत रेवती सुळे?
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून पदवी पूर्ण केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात रेवती सुळे या राजकारणात सक्रिय नाहीत, मात्र बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी पहिल्यांदाच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. Revati Sule Marriage
हेही वाचा :






