Supriya Sule : “आजच्या दिवशी तुझं नसणं…,” भाऊबीजनिमित्त अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट
Supriya Sule : अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांनी यंदा दिवाळी देखील साजरी केली नाही

Supriya Sule : आज भाऊबीजनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले दिवंगत बंधू अजित पवार यांच्या आठवणीत एक अत्यंत भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी अजित पवारांसोबतचा एक जुना व्हिडिओही पोस्ट केला आहे.
सुप्रिया सुळेंची पोस्ट-
सुप्रिया सुळे यांनी भावूक पोस्ट करत लिहिले की, “दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली आहे. आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात.”
दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली.
आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात.
दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील ❤️
— Supriya Sule (@supriya_sule) November 11, 2026
अजितदादांच्या पाठीशी असलेल्या बहिणींच्या या ओढ आणि आठवणींचा उल्लेख करत त्यांनी शेवटी लिहिले, “दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील.”
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांनी यंदा दिवाळी देखील साजरी केली नाही. दरवर्षी बारामतीमध्ये पवार कुटुंबीय आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात. मात्र, यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम पार पडला नाही. मंगळवारी दिवाळी पाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुटुंबीय आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.





