Sharmila Tagore : ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल; नेमकं प्रकरण काय?

Sharmila Tagore – भटक्या कुत्र्यांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजत असून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या मुद्द्यावरून प्राणी मित्र आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास असलेले असे दोन गट समोरासमोर आलेले आहेत. आज झालेल्या सुनावणीत खंडपीठाने ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनाही खडेबोल सुनावले. तसेच त्या वास्तवापासून दूर असल्याचे सांगितले.
अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी सार्वजनिक जागांवरील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय करायला हवे, यासाठी काही सल्ले दिले होते. या सल्ल्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने झिडकारून लावले.
शर्मिला टागोर यांच्या वकिलांनी दिल्लीतील एम्स परिसरात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या एका गोल्डी नावाच्या भटक्या कुत्र्याचे उदाहरण दिले. हा कुत्रा अनेक वर्षांपासून या परिसरात मिसळला असून सर्वांचा लाडका झाल्याचे वकिलांनी म्हटले.
यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे समर्थन करणे योग्य नाही. तसेच या कुत्र्याला काय ऑपरेशन थिएटरमध्येही नेले जात होते का? असाही प्रश्न खंडपीठाने विचारला.





