Maharashtra Election : EVM ला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर विरोधी पक्षातील राज्यातील नेत्यांनी वारंवार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. यानंतर विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात EVM ला विरोध करणारी याचिका दाखल केली. मात्र ती याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे.
काय म्हंटले होते याचिकेमध्ये?
पॉल यांनी केलेली याचिका जुनी होती. एलन मस्क हे एक्सचे (पूर्वीचे ट्वीटर) मालक यांनी पोस्ट करत ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा केला होता. त्या दरम्यान त्यांच्या पोस्टचा हवाला देत याचिका दाखल करण्यात आली होती. ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपर घ्या, जेणेकरून भारतीय नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ होईल. परंतु ही याचिका फेटाळण्यात आल्याने मविआला मोठा धक्का बसला आहे.
कोर्ट काय म्हणाले?
जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात, मात्र निवडणूक हरले की तुम्हाला त्यात छेडछाड दिसते असे म्हणत सु्प्रीम कोर्टाने विरोधकांची ही याचिका फेटाळली आहे.





