Ramesh Mhatre : डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंच्या नगरसेवकाला फटकारले
Ramesh Mhatre : डॉक्टरांवर हात टाकणे किंवा त्यांच्यावर हल्ले करणे खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एकनाथ शिंदेच्या गटाच्या नगरसेवकाला फटकारले.

Ramesh Mhatre : डॉक्टरांवर हात टाकणे किंवा त्यांच्यावर हल्ले करणे खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एकनाथ शिंदेच्या गटाच्या नगरसेवकाला फटकारले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द केला आहे. (Ramesh Mhatre)
तसेच, पुढील तीन दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. (Ramesh Mhatre)
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या प्रकरणामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Ramesh Mhatre)
खंडपीठाने म्हटले की, वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तींवर झालेले मारहाणीचे आणि हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. हा संदेश स्पष्टपणे गेला पाहिजे. ते लोकांची सेवा करतात आणि अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ले केले जाऊ शकत नाहीत. तसेच म्हात्रे प्रकरणांनंतर त्याच पक्षाशी संबंधित अशीच आणखी एक घटना घडल्याचेही न्यायालयाने नमूद केले. (Ramesh Mhatre)
दरम्यान, रमेश म्हात्रे यांना या प्रकरणात सुरुवातीला कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, 18 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या जामीन आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने 7 ऑगस्ट रोजी कठोर अटींसह म्हात्रे यांना जामीन मंजूर केला. आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याची अटही घालण्यात आली होती. (Ramesh Mhatre)

