Ramesh Mhatre : नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ला प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर शिंदेसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) अखेर विष्णूनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

Ramesh Mhatre : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ला प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर शिंदेसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) अखेर विष्णूनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
न्यायालयाने संध्याकाळी ५ पर्यंतची मुदत दिली होती. त्याच्या काही तास आधी म्हात्रेने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. म्हात्रे यांना कल्याण दंडाधिकारी न्यायालयात नेण्यात आले, जिथे त्यांना (Ramesh Mhatre) ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
कल्याण न्यायालयाने म्हात्रेला दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. अनेक गुन्हे नावावर असलेल्या म्हात्रेला जामीन देणाऱ्या कल्याण न्यायालयाबद्दल उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले होते. १९ जुलैच्या संध्याकाळी ५ पर्यंत पोलिसांसमोर हजर न झाल्यास मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका न्यायालयाने घेतली.
न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कल्याण न्यायालयात नेले आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी डॉक्टरांवर हल्ला झाला होता. या प्रकरणी कल्याण न्यायालयाने म्हात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे आधारवाडी तुरुंगात असलेल्या म्हात्रेच्या सहकाऱ्यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला.सोबतच म्हात्रेला (Ramesh Mhatre) दिलासा मिळाला.
म्हात्रे विरोधात १८ गुन्हे दाखल असले तरीही १७ गुन्ह्यांत त्याची निर्दोष सुटका झालेली आहे. म्हात्रे आजारी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा युक्तिवाद म्हात्रेच्या वकिलांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. पण उच्च न्यायालयाने म्हात्रेला दणका देत त्याचा जामीन रद्द केला.






