पुणे जिल्हा | पतित पावन संघटनेचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा

इंदापूर, (प्रतिनिधी)- पतीत पावन संघटना यांनी गणेश मंगल कार्यालय नांदेड फाटा येथे संघटनेच्या खडकवासला विभागाच्या वतीने, बारामती लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन खडकवासला विभाग अध्यक्ष तेजस पाबळे व विभाग प्रमुख सौरभ कुलकर्णी यांनी केले. जवळपास 700 ते 800 कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नितीन सोनटक्के म्हणाले दिलेला शब्द पाळणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. विकासाला गती देण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी पतीत पावन संघटना खंबीर उभी राहणार आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बापू कोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार, पप्पु टेमघरे, सुनिल मराठे, माऊली साठे, विजय गावडे, शरद देशमुख, राजु बर्गे, हराळे पाटील, शंकर बरके, अण्णा बांगर, प्रशांत कुरूमकर, अक्षय बर्गे, सागर धिवार, अनिकेत बांदल, सनी शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.





