Haiwaan Movie : 18 वर्षानंतर सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र! ‘हैवान’ची रिलीज डेट जाहीर
Haiwaan Movie : या चित्रपटाचे नाव हैवान असून गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाविषयी अपडेट समोर येत आहेत.

Haiwaan Movie : अक्षय कुमार ( Akshay Kumar ) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘भूंत बंगला’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रियदर्शन आणखी एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या आगामी सस्पेन्स-क्राइम थ्रिलर चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या चित्रपटाचे नाव हैवान ( Haiwaan) असून गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाविषयी अपडेट समोर येत आहेत. आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खिलाडी आणि अनाडी अर्थात अक्षय कुमार आणि सैफ अली खान या चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
निर्मिती संस्था केव्हीएन प्रॉडक्शन्सने इंस्टाग्राम पोस्टद्वारे हैवान चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली. इंन्स्टाग्रामवरील पोस्टसोबत “एक वेड… एक अखंड प्रयत्न… आणि एक तारीख जी तुम्ही कधीच विसरणार नाही. प्रियदर्शन यांचा ‘हैवान’ ११ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.” असे म्हटले आहे. (Haiwaan Movie)
हेही वाचा : Raveena Tandon : तो अजिबात बदललेला नाही; 22 वर्षांनंतर अक्षयसोबत काम करताच रवीना टंडन भरभरून बोलली
या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत आनंद व्यक्त केला. अनेकांनी अक्षय कुमारच्या आणखी एका दमदार चित्रपटाची उत्सुकता व्यक्त केली, तर काहींनी सैफ अली खानच्या मुख्य भूमिकेतील पुनरागमनाचे स्वागत केले. अनेक चाहत्यांनी या जोडीला “ब्लॉकबस्टर कॉम्बिनेशन” असेही संबोधले आहे. (Haiwaan Movie)
नव्वदच्या दशकात अक्षय कुमार आणि सैफ अली खान या लोकप्रिय जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले आहे. त्यापैकी ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘तू चोर मैं सिपाही’, ‘आरजू’ आणि ‘तशन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता तब्बल १८ वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा हैवान चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित दिसत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (Haiwaan Movie)





