RCB vs SRH : आरसीबीच्या टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याच्या आशांना मोठा धक्का, हैदराबादकडून पत्करावा लागला पराभव

RCB vs SRH Sunrisers Hyderabad beat Royal Challengers Bangalore : आयपीएल २०२५ मध्ये, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादकडून आरसीबीला ४२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे गुणतालिकेत टॉप-२ मध्ये स्थान निश्चित करण्याच्या आरसीबीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना टॉप-२ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकायचे होते. मात्र, या पराभवामुळे आता इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने इशान किशनच्या नाबाद ९४ धावांच्या खेळीच्या जोरावर २३१ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात, आरसीबीची स्थिती १४ षटकांत ३ बाद १६३ अशी होती. यानंतरही, संघ शेवटच्या षटकात १८९ धावांवर ऑलआउट झाला. आरसीबीकडून फिल सॉल्टने सर्वाधिक ६२ धावांची खेळी साकारली. पण त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
The Curvv Super Striker of the Match between Royal Challengers Bengaluru and Sunrisers Hyderabad goes to Abhishek Sharma. #TATAIPL | #RCBvSRH | #CurvvSuperStriker | @TataMotors_Cars pic.twitter.com/sA9ZjJEBYe
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2025
आरसीबीचा संघ १८९ धावांवर झाला ऑलआउट –
लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ १८९ धावांवर गारद झाला. विराट आणि सॉल्ट वगळता कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. सॉल्टने ३२ चेंडूत ६२ धावा केल्या, विराट कोहलीने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याच्यानंतर, मयंक अग्रवाल ११ धावा करू शकला आणि रजत पाटीदार १८ धावा करू शकला. जितेश शर्माने २४ धावांची खेळी केली. पहिल्याच चेंडूवर रोमारियो शेफर्ड बाद झाला. कृणाल पांड्याने ८ धावांची खेळी केली.
हेही वाचा – RCB vs SRH : अभिषेकच्या षटकाराने स्टेडियममध्ये तोडफोड, ‘या’ खेळाडूंना मिळणार ५ लाखांचे मोफत किट
इशान किशनने साकारली ९४ धावांची वादळी खेळी –
Composed. Classy. Clutch 🧡
Ishan Kishan’s gem of a knock gets him a Player of the Match award! 🫡
Scorecard ▶ https://t.co/sJ6dOP9ung#TATAIPL | #RCBvSRH | @SunRisers | @ishankishan51 pic.twitter.com/LW8sSxgoHe
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2025
टिम डेव्हिडला फक्त १ धाव करता आली. आरसीबीने शेवटच्या ७ विकेट्स १६ धावांत गमावल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्सने ३ विकेट घेतल्या. जयदेव उनाडकटने एक विकेट्स घेतली. इशान मलिंगाने २ विकेट्स घेतल्या. हर्ष दुबे, रेड्डी आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली. हैदराबादच्या विजयाची पटकथा अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी लिहिली होती. इशान किशनने ४८ चेंडूत ९४ धावा केल्या. या खेळाडूने ७ चौकार आणि ५ षटकार मारले. अभिषेक शर्माने १७ चेंडूत ३४ धावा केल्या आणि त्यात ३ षटकार आणि ३ चौकार मारले.
हेही वाचा – RCB vs SRH : अभिषेक शर्माने केला ऐतिहासिक पराक्रम! ज्याच्या आसपास नाहीय एकही भारतीय खेळाडू
इशान किशन ठरला सामनावीर –
अनिकेत वर्माने ९ चेंडूत २६ धावा केल्या. इशान किशनला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या खेळाडूने सांगितले की खेळपट्टी खूप चांगली होती त्यामुळे संघाचे लक्ष्य किमान २०० धावा करण्याचे होते, त्यामुळे काही चांगले शॉट्स खेळणे महत्त्वाचे होते. इशान किशन म्हणाला की, त्याने सराव सत्रांमध्ये चांगला सराव केला, तिथे चांगले शॉट्स खेळले आणि त्याचे फळ त्याला सामन्यात मिळाले.





